रमजानच्या आधी औरंगाबाद शहरात ‘या’ ठिकाणी सापडला शास्त्र साठा, पोलिसांकडून तपस सुरु

औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात शास्त्र साठा संपल्याची माहिती समोर येत आहे. हा शस्त्रसाठा कुरियरच्या माध्यमातून शहरात आला, पाठवला कुणी आणि हे शास्त्र कुणी मागवले हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. तब्बल ३६ तलवार आणि १ कुकरी पोलिसांनी जप्त केली आहे. शहरात हा शस्त्रसाठा आल्याची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो जप्त केला आहे. यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

DTCL या कुरियर कंपनीद्वारे हे सर्व शास्त्र शहरात आले. या पार्सलवर संशय आल्याने तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. तातडीने पोलिसांनी धाव घेत हा साठा ताब्यात घेतला. एवढा साठा शहरात पवित्र रंजन आणि गुढीपाडव्याच्या आधी एवढा शास्त्र साठा सापडल्याने पोलीस दल देखील हादरले आहे. शहरातील सण उत्सवांचे वातावरण पाहता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या पार्सलबाबत क्रांती चौक पोलिसांमार्फत अधिक तपास केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *