पुन्हा एका हत्याकांडानं दिल्ली हादरली! एकाच घरात आढळले चार मृतदेह

Delhi Crime : श्रद्धा हत्याकांडानं आधीच हादरलेली दिल्ली पुन्हा एकदा हादरली. एकाच घरात आढळले चार मृतदेह.

पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या भारताच्या हालचालींना वेग ? भारतीय लष्कर सज्ज अधिकाऱ्याचं मोठं विधान

Delhi Boy Killed Family Members: श्रद्धा वालकर हत्याकांडाचा (Shraddha Murder Case) खुलासा झाल्यानंतर देशाच्या राजधानीचं शहर असणारी दिल्ली (Delhi Crime) हादरली. घटनेच्या तपासात एकापाठोपाठ उलगडणाऱ्या गोष्टींनी थरकाप उडवून दिला. अशातच आता दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात एकाच घरात पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका मुलानं आपले आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजताच्या सुमारात पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त ? ही 4 मोठी कारणे आहेत

आरोपी मुलगा व्यसनाधीन असून तो सतत अमंली पदार्थांचं व्यसन करायचा. तसेच, नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख पटवली आहे. केशव असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 25 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अद्याप कोणतीची माहिती दिलेली नाही.

मृत व्यक्तींची नावं :

आरोपीचे वडील 42 वर्षीय दिनेश कुमार
आरोपीची आजी दीवानो देवी
आरोपीची आई दर्शन सैनी (40)
आरोपीची बहीण उर्वशी (22)

या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता वीज बिल जमा करावे लागणार नाही, जाणून घ्या कारण

दिल्लीतील गुन्हेगारीचा वाढता आलेख
काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकाडांनं संपूर्ण देश हादरला. श्रद्धाची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबनं निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत फेकून दिले. श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबनंही आपला गुन्हाही कोर्टासमोर कबूल केला आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत. पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी न्यायालयानं आफताबच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे. काल (मंगळवारी) आफताबची पॉलिग्राफ टेस्टही करण्यात आली. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर दिल्लीतील अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे दिल्लीत गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

SBI मध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीची संधी, sbi.co.in वर अर्ज करा, पगार जाणून घ्या

गूड न्युज: सरकारच्या या घोषणेमुळे आता शेतकर्‍यांना वीज बिल भरावे लागणार नाही, जाणून घ्या कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *