क्राईम बिट

कामावरून काढल्याचा राग ; मालकिणीस पेटवले 

Share Now
कामावरून काढल्याच्या रागातून टेलरिंग दुकानातील कामगाराने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरीमध्ये घडली. घटनेत मालकिणीसह तिला पेटवून देणाऱ्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला.  कामगार मिलिंद नाथसागर (वय३५) आणि दुकान मालकीण बाला नोया जोनिंग (३२, रा. मांदळे निवास, वडगाव शेरी ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत प्रशांत कुमार सुशांत कुमार देबणार जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत.
बाला यांचे वडगाव शेरीत टेलरिंग दुकान आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानात नाथसागर कामाला आला. मात्र, तो व्यवस्थित काम करत नसल्याने आठवड्यांपूर्वी बाला यांनी  त्याला कामावरून काढून टाकले.
सोमवारी रात्री नाथसागर दुकान गेला व बाला यांच्याशी वाद घालू लागला. बाटलीत आणलेले पेट्रोल त्याने बाला यांच्या अंगावर ओतले लायटरने पेटविले. नंतर बाला यांनी त्याला पकडल्याने दोघेही गंभी भाजले. नाथसागरचा मित्र प्रशांतकुमार दुकानाबाहेर थांबला होता. त्यान दरवाजा उघडला. तोवर दुकानातील कपड्यांनी पेट घेतला होता. या घटनेत देबनारही जखमी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *