VIDEO| “लाव रे तो व्हीडिओ” म्हणत अंबादास दानवेंचा वेगळ्या शैलीत अमित ठाकरेंना टोला

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी उचलून धरलेला मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण पेटलं आहे. अशावेळी राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे. अशावेळी आज राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जात सभा स्थळाची पाहणी केली.

हेही वाचा : सातव्यानंतर आठवे वेतन आयोग येणार नाही?, पगारवाढीचे सूत्र बदलणार!

त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पोलिसांनी सभेसाठी घातलेल्या अटींबाबत प्रश्न विचारला. त्यावर अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट करत आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं वक्तव्य केलंय. अमित ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केलाय. मनसेच्या टोल आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यावर पडलेल्या केसेस आणि त्यात त्यांचे झालेले हाल दाखवणारा एक व्हिडीओच दानवे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलाय.

हेही वाचा : गाय आणि म्हशीच्या कानातील ‘आधार कार्ड’ टॅग आहे ! त्याबद्दलचे फायदे जाणून घ्या

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय. आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर आता अंबादास दानवे यांनी एक जुना व्हिडीओ पोस्ट करत ‘फक्त कार्यकर्ते जेलमध्ये जाणार. तुम्ही निव्वळ राजकारण करणार, शेवटी राजकारण तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे’, अशी घणाघाती टीका यांनी केली आहे. लाव रे तो व्हीडिओ म्हणून त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *