आमदारांच्या प्रवासाला सरकारी कुशन ! मिळणार तीस लाखांचे बिनव्याजी कर्ज
राज्य सरकारने नुकतीच एक निर्णय घेतला आहे, आमदारांना गाडीसाठी ३० लाखाच बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे, आधीचे १० लाख कमी होते म्हणे, इनोव्हाही येत नाही त्यात, आता तर फॉर्च्युनर आमदारांची मनपसंत गाडी झालीय याची सुरुवातच तीस लाखांपासून होत असल्याने किमान एवढे तरी मिळाले पाहिजेत ना ! बाकी ‘वरचे वर टाकता येतील’ असाही बहुदा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे.
याआधी आमदारांना वैव्यक्तिक गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळत असे. आता आमदारांना बिनव्याजी २० लाख रुपये वाढीव देण्यास राज्यसरकारने मजूर दिली आहे. त्यामुळे आमदारांचा प्रवास आणखी सुखकर आणि आरामदायी होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडी खरेदीसाठी ३० लाखाचं कर्ज देण्याची घोषण करुन आमदारांना खूष केलं आहे. यासाठी सरकारने दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागणार आहे. त्यावरील व्याज सरकार भरणार आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकही खुश असल्याने या निर्णयावर कोणताही विरोध नाही.
सरकारला आता आमदारांच्या आरामदायी प्रवासाची चिंता लागली आहे. आमदारांना गाडी खरेदीसाठी ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने आमदारांना आता फॉर्च्युनर सोबतच स्कोडा, एमजी ग्लोस्टर, एमजी झेड एक्स, इनोव्हा यासारख्या आरामदायी गाड्या घेता येणार आहेत. चालक भत्ताही वाढवला आहेच आणि स्थानिक निधीतही भरघोस वाढ करून दादांनी सगळ्यांना आधीच खुश केले आहे.