नुपूर शर्माचा हत्या करण्यासाठी आलेला ‘तो’ पाकिस्तानी पोलिसांच्या हाती
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या हत्येच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र यात आता पाकिस्तानी कनेक्शन असल्याचेही समोर येते आहे. नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी एक पाकिस्तानी नागरीक भारतात प्रवेश करत असताना त्याला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानातील श्री गंगानगरमध्ये त्याला पोलिसांनी पकडले. आता गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी या पाकिस्तानी नागरिकाची चौकशी करत आहेत.
गुगल औरंगाबाला म्हणतंय ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’
हिंदूमालकोट या सीमारेषेजवळच्या गावातून या पाकिस्तानी नागरीकाला अटक करण्यात आली. १६ जुलैला रात्री ११ वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तिथे गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तो संशयास्पद रितीने फिरत असल्याचे दिसले. त्याला ताबडतोब ताब्यात घेतले गेले. त्याच्याकडे ११ इंची चाकू, धार्मिक पुस्तके, कपडे, अन्नपदार्थ आणि वाळूने भरलेली पिशवी असे सामान होते. रिझवान अश्रफ असे या तरुणाचे नाव आहे. पाकिस्तानातील उत्तर पंजाब भागातील हा तरुण आहे. त्याची प्राथमिक चौकशी केल्यावर आपण नुपूर शर्माला मारण्यासाठी आलो होतो असे त्याने सांगितले.
शेती हा इतका शाश्वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे – एकदा वाचाच
ही योजना अमलात आणण्यापूर्वी आपण अजमेर दर्ग्याला भेट देणार होतो, असेही त्याने सांगितले. सीमासुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, त्याला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिथे त्याची अधिक चौकशी होईल. त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि नंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. गुप्तचर संस्थांना त्याच्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. आता रॉ, आयबी व लष्करी गुप्तचर यंत्रणांमार्फत त्याची चौकशी सुरू आहे.
नुपूर शर्मा यांनी एका वाहिनीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात वातावरण तापले. नुपूर शर्मा यांची हत्या करण्याच्या अनेक धमक्या दिल्या जाऊ लागल्या. राजस्थानातील उदयपूर येथे तर कन्हैय्यालाल या टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्याचे शीर धडावेगळे करण्यापर्यंत हे प्रकरण चिघळले. बिहारमध्येही नुपूर शर्माप्रकरणावरून एका तरुणावर चाकूहल्ला झाला.