क्राईम बिट

४ महिला आमदारांची आर्थिक फसवणूक ; पुण्यात गुन्हा दाखल

Share Now

राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे. सदरील प्रकरण पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. आमदार माधुरी मिसाळ , श्वेता महाले , मेघना बोर्डीकर , देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत समोर आली असून .

इन्स्टावाली लव्ह स्टोरी, भंडाऱ्याहून तरुणी नांदेडला आली पण प्रियकर काही भेटला नाही

या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांकडे मदत करण्याची मागणी केली होती . आई आजारी असल्याचं कारण सांगत या व्यक्तीनं महिला आमदारांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *