मुलगी जन्माला घातली म्हणून सासरच्यांनी ऍसिड पाजून महिलेची केली हत्या
आसाममधील करीमगंज येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे . येथे एका महिलेला सासरच्यांनी जबरदस्तीने ऍसिड पाजले आणि तिची हत्या केली. मुलीला जन्म दिल्याने सासरच्या लोकांनी महिलेचा छळ केला, त्यानंतर सासरच्यांनी महिलेचा मानसिक छळ करून तिला ऍसिड पाजण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. ही घटना जिल्ह्यातील भैरबनगर भागातील असून, तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Assam | A woman was allegedly killed by her in-laws after they forced her to consume acid in Assam’s Karimganj. The husband would physically & mentally torture her. He has been arrested & a case has been filed on complaint of victim's family: Padmanabh Baruah, SP Karimganj
— ANI (@ANI) July 14, 2022
न जेवण करता पती झोपला पत्नीने क्रिकेट बेटने केली मारहाण, तब्बल डोक्याला लागले १५ टाके
स्थानिक प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुमन बेगम नावाच्या महिलेला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी जबरदस्तीने ऍसिड आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती शकील अहमदला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेनंतर पीडित महिलेला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
एसपी करीमगंजचे एसपी पद्मनाथ बरुआ म्हणाले, “आसाममधील करीमगंजमध्ये एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी अॅसिड सेवन करण्यास भाग पाडल्यानंतर तिचा खून करण्यात आला. तिचा पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. त्याला अटक करण्यात आली असून पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.