महाराष्ट्र

औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात आणखी एक खून

Share Now

नशेखोरीतून होणारे वाद आणि त्याचे पर्यवसान खुनात होण्याचे सत्र सुरूच असून, त्यात आणखी एका खुनाची भर पडली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या दलालवाडी भागात एका ३२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. रिझवान उलहक इम्रान उलहक (३२) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा खुनी मित्र वसीम उर्फ हमला रमजानी कुरेशी (२८, रा. दलालवाडी) याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

महाविकास आघाडी सरकार पडणार का? कॉग्रेस राष्ट्रवादी आम्हाला नको, शिवसेनेच्या १९ नाराज उमेदवारांची भूमिका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लेखाना भागात राहणारा रिझवान याचे नेहमी दलालवाडी परिसरात राहणाऱ्या मित्रांकडे येणे-जाणे होते. येथे आल्यानंतर उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी करणे आणि नंतरच घरी परतणे असे तो करायचा. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येथे आल्यानंतर तो वसीमसोबत दलालवाडी भागातील एका रिकाम्या प्लॉटवर दारू पित बसला होता.

बाजारात आणलेले शेतमाल भिजले, शेवटी जबाबदार कोण?

काही वेळातच दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर वसीमने त्याच्याकडील चाकू काढून रिझवान याच्यावर सपासप वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अति रक्तस्राव झाल्यामुळे काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *