मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू; गुन्हा दाखल
काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आले होते. सभा झाल्यावर आपल्या गावी परतताना एका शिवसैनिकाच्या भरधाव गाडीने एका वर्षीय चिमुकलीला उडवले आहे. ही घटना काल रात्री 11 वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील सिडको उड्डाणपूलाखाली एपीआय कॉर्नर येथे घडली.
हेही वाचा :
- ऐकावे ते नवल ! पाकिस्तानात रात्री १० नंतर लग्नाला बंदी, कारण…
- भारत लवकरच 1.2 दशलक्ष टन गव्हाच्या निर्यातीला मान्यता देणार ?
विभा सतीश राऊत (वय 4) असे चिमुकलीचे नाव आहे. ही चिमुकली व तीचे आईवडील आपल्या स्कुटीवर सिडको पुलाखाली थांबले होते. यादरम्यान सिडको बसस्थानकाच्या दिशेने एक भरधाव बोलेरोने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. यामध्ये चिमुकली गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.