राज ठाकरेंच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होणार आहे. तसेच मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आले.
हेही वाचा :
- (MSP)एमएसपी वाढल्याने कोणते पीक घेणे फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी, या पिकाला सर्वाधिक ‘नफा’
- सिद्धू मुसेवाला प्रकरणातील ‘तो’ शुटर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिरीष पारकर या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश बजावला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. राज ठाकरे हे वॉरेंट हुकूम देऊन देखील न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा वॉरंट बजावले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर शिराळा न्यायालयात खटला दाखल आहे