जुलै ते ऑगोस्ट पर्यंत राज्यात महापालिका निवडणुक होणार?
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या १४ स्थानिक स्वराज्य संस्थ्येच्या निवडणूक येत्या जुलै ते ऑगोस्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातील संकेत राज्य निवडणूक आयोगानं दिले आहे. ३१ मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे लवकरच १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतही पार पडली. अशातच, राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाच्याा आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यास राज्यात या निवडणुका रंगणार आहेत.
हेही वाचा : एका हेक्टरमध्ये ७६ क्विंटल गव्हाचे उत्पादन देणारं हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त
दरम्यान, १४ नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात, राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, “स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक.” या पत्रात पुढे निवडणूक आयोगानं नमूद केलंय की, १४ महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसेच, या निवडणुकीसाठीची मतदार यादी ७ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असंही निवडणूक आयोगानं या पत्रात नमूद केलं आहे. या मुळे स्थानिक पातळीवर या निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहत आहे.
हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि सिद्धू मुसावालाच्या परिवाराची झाली भेट, केली ‘हि’ मोठी मागणी
तसेच, राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातील काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.