माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराची मागणी करणारी याचिका फेटाळली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. त्याच्या वतीने खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती . मात्र या प्रकरणावर सुनावणी करताना त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्याने जेजे रुग्णालयात उपचार सुरू ठेवावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत .
अनिल देशमुख यांना खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यासाठी त्यांनी खासगी रुग्णलयात करण्यासाठी कोर्टात मागणी केली होती मात्र ईडीने सादर केलेला देशमुखांचा वैद्यकीय अहवाल निर्णायक ठरला आहे. खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. अनिल देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती.
हेही वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : DAP ला पर्याय मिळाला ‘प्रॉम’ (PROM) हा पर्याय, आता खताच ‘नो टेन्शन’
जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती.
हेही वाचा :- त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला नसता तर आणखी एका महिलेचा होणार होता खून