प्रेमात अडचण ठरणाऱ्या महिलेचा अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडला हाताशी घेऊन केला खून
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या महिलेचा एका अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंड अल्पवयीन मैत्रीण आणि मित्राच्या मदतीने बाळापूर शिवारातील शेतात बोलावून घेऊन गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी १२ तासाच्या आत या खुनाचा उलगडा करीत मारेकरी बॉयफ्रेंड व त्याच्या मित्रास अटक केली. दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेमुळे मुकुंदवाड़ी परिसर हादरून गेला आहे.
सुशिला संजय पवार ( ३९. रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. मुख्य आरोपी दीपक राजू भताडे (२४, रा. शिवाजीनगर, गल्लीनं २, गारखेडा), त्याचा मित्र सुनील ऊर्फ राहुल संजय महेर (१९, रा. हीनानगर) सुशिला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेवर ईडीची कारवाई ? जळगाव दौऱ्यातील भाषणात मुंडेंचा गौप्यस्फोट
शिवाजीनगरातील जलकुंभाजवळ सुशिला भाजीपाला विक्री करीत असत. रविवारी रात्री ११ वाजता त्यांना १७ वर्षाच्या मुलीने फोन करून बाळापूर शिवारात बोलावून घेतले. सुशिला दुचाकीवरून गेल्यानंतर दीपक याने १७ वर्षांच्या मुलीसोबतच्या प्रेमात तुम्ही अडथळा निर्माण करू नका, असे सांगितले. त्यावरून वाद सुरू झाला १२ वर्षाच्या मुलीने सुशिलांचे केस पकडले सुनीलने एक हात पकडला, मुलीने दुसरा हात पकडल सुशिला यांच्या मानेवर चाकूने आठ वार केले. जागीच सुशीला यांचा मृत्यु झाला आणि चौघे गाडी घेऊन निघून गेले.
…………..
नवीन चाकू, सीमकार्डची खरेदी : सुशीला यांचा
खून करण्याची योजना चौकडीने काही दिवसांपूर्वीच बनवली होती. त्यासाठी धारदार चाकू खरेदीही केली होती. तसेच फोन करून शेतात बोलावण्यासाठी दुसचाच एका व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड खरेदी केले होते. त्या नंबरवरून फोन करून बाळापूर शिवारात सुशिला यांना बोलावून घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
मोठ्या मुलाचा २७ रोजी
मृताच्या मुलाचा विवाह २७ मे रोजी होणा दृष्टीने तयारी सुरु होती. रविवारी मुलगा बाहेरगावी गेला असताना त्यास आईने फो सोन्याची व्यवस्था झाली असून, सर्व सोने आणले असल्याचे सांगितले होते.
प्रेमप्रकरणातून कृत्य
गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक भताडे २७ वर्षांच्या मुलीसोबत काही वर्षापास प्रेमप्रकरण सुरु होते. यात दोपकच्या मदतीला त्याचा मित्र सुनील आला. १७ वर्षाच्या मुलीच्या मदतीला तिची १२५ मैत्रीण आल्याचे चौकशीत समोर आले.
ग्रामीण पोलिसांचा गुंतागुंतीच्या प्रकरणाचा कुशल तपास केला, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत भवर हे दिवसभर चिकलठाणा पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. निरीक्षक देविदास गात, एलसीबीचे उपनिरीक्षक विजय जाधव, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, योगेश खटाणे यांच्या पथकांनी सर्व बाजूंनी तपास करीत खुनाचा उलगडा केला.
हेही वाचा :-ऑटो ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना मिळतोय बंपर उत्पादन आणि दुप्पट नफा