महाराष्ट्र

२४ तासापासून औरंगाबाद शहरात पाणी प्रश्नावर आंदोलन सुरु

Share Now

औरंगाबाद :- आगामी काळात मनसे भाजपसोबत युती करणार अश्या चर्चेला सध्या गेल्या काही दिवसापासून उधाण आलं आहे. याच उदाहरण द्यायचं झालं तर कालपासून औरंगाबाद शहारत पाणी प्रश्नावर भाजपच्या वतीने सिडको हडको भागातील एन-७ येथील पाण्याच्या टाकीसमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :- IAS पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई ; सीएच्या घरातून १९.३१ कोटी सापडले

सिडको-हडको भागात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी भाजप, मनसेतर्फे पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे . यावेळी पाणी द्या पाणी द्या, हल्लाबोल हल्लाबोल, महापालिका प्रशासकांचे करायचे काय…अशा घोषणा देण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरु होते. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक ठाम होते.

आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, माजी जिल्हाध्यक्ष बस्वराज मंगरूळे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, महेश माळवदकर, राजगौरव वानखेडे, सरचिटणीस समीर राजूरकर, सतीश खेळकर, विकास पाटील, सोहन प्रधान, चंदु नवपुते, गणेश साळुंके, अविनाश फोकळे, अनिकेत निलावर, सागर पाटील, भदाने पाटील, राजू शेजवळ, मंदा शेजवळ, माधुरी अदवंत, सरीत घोरपडे, पुजा सोनवणे, अभय देशमुख, राहुल बोधनकर, मुकेश जैन सहभागी झाले होते. हे आंदोलन राजकीय नसून, जनतेचे आंदोलन असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

हेही वाचा :- विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून, दीड वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर फरार

पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार ..
भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत स्वच्छ आणि वेळेवर पाणी मिळत नाही तो पर्यंत पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे , भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले .

अधिकारी आयुक्तांची करतात दिशाभूल
यापूर्वी भाजपच्या वतीने पाण्यासाठी एप्रिल महिन्यात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासकांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसात सिडको-हडकोतील पाणी सुरळीत करू, असे आश्‍वासन दिले. परंतु पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. आठव्या-नव्या दिवशी, पाणी मिळत आहे. अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी नगरसेवक नितीन चित्ते यांनी केला.

हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *