सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री ; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला
घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी महागला आहे.
आज झालेल्या या दरवाढीमुळे आजपासून घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिक आधीच अडचणीत आहे यात सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली असून, एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.
हेही वाचा :- नागरिकांनो काळजी घ्या ..! राज्यातील ‘या’ शहरात पुन्हा उष्णतेची लाट
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती . एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २३५५.५० रुपये झाली, जी पूर्वी २२५३ रुपये होती. तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.तसेच आता घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला आहे.
हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या