पैसे न दिल्याच्या कारणाने, मुलाने केला पित्याचा खून
केज :- केज तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या मदतीने जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात शेतात पेरणी करण्याच्या तिफणीचा फण मारला. यात गंभीर जखमी पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी तालुक्यातील बेंगळवाडी येथे उघडकीस आली. रमेश सोनाजी शिंदे (३८, रा. बेंगळवाडी) असे मयताचे नाव आहे.
हेही वाचा :- एक नाही तर चार लग्न करून पैसे वसूल करणारी महिला, पोलिसांच्या ताब्यात
रमेशचे बंधू बाबूराव शिंदे यांनी रोजी केज ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार, पैशाच्या कारणावरून शिंदे कुटुंबात नेहमी वाद होत, असे समजले. २३ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता रमेश सोनाजी शिंदे यांच्याकडे मुलगा ऋषिकेश शिंदे आणि पत्नी हिराबाई शिंदे यांनी घरखर्चासाठी पैसे मागितले असता रमेशने पैसे नाहीत असे सांगितले. त्यावर ऋषिकेश व हिराबाई यांनी रागाच्या भरात अंगणात पहलेला तिफणीचा फण उचलून वडील रमेश शिंदे यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे रमेश यांच्या डोक्यातून रक्तश्राव झाला आणि ते जमिनीवर कोसळले.
मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा – सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला महत्वाची सूचना
भांडण सोडवायला रमेश यांचे भाऊ बाबूराव शिंदे गेले असता त्यांनाही हलविले, मारहाण केली. रमेशला पुन्हा मार म्हणून ऋषिकेशला त्याची आई हिराबाई शिंदे हिने प्रवृत्त केले. रमेश शिंदे यांना भाऊ बाबूराव शिंदे यांनी गावकऱ्यांच्या व नातेवाइकांच्या मदतीने नेकनूर येथील प्राथमिक रक्तस्त्राव झाल्याने ते जमिनीवर आरोग्य केंद्रात दाखल केले.
अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून पुण्याला हलवले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ मे रोजी दुपारी ४ वाजता रमेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा ऋषिकेश शिंदे आणि पत्नी हिराबाई शिंदे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.