फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे. – राज ठाकरे भूमिकेवर ठाम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला असून . औरंगाबादच्या सभेत १ मे रोजी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी औरंगाबाद सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ तारखेनंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकरचा वापर होत असेल तर मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करणार असा इशारा त्यांनी दिला होता.
आज पुन्हा एकदा, तक्रार दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे.
“महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”
मा. श्री. राजसाहेब ठाकरे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid026tDih7h2daZvJ6qJpcn3VcU7vcoFRQBZTqFdPQCu5nVobiF3Wormsx2mupvt2Cuol&id=100044506896605