महाराष्ट्र

शाहीर महर्षी आत्माराम पाटील “बालशाहीर आणि आत्मसन्मान” पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Share Now

औरंगाबाद :-  शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाचे दशकपूर्ती वर्ष आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११३ जयंतीनिमित्त शाहीरमहर्षी आत्माराम पाटील बालशाहीर पुरस्कार प्रदान सोहळा आणि आत्मसन्मान २०२२’ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि 30 रोजी   हा कार्यक्रम मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे पार पडला.

या कार्यक्रमास शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, जेष्ठ शाहीर आंबदासजी तावरे तसेच सचिव शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

२०१७ १८ चा बालशाहीर पुरस्कार सांगली येथील बालशाहीर संचिता ऐवळे, २०१८-१९ वर्षांचा पुरस्कार पुणे येथील चैतन्य काजुळकर, २०१९-२०चा पुरस्कार अंबाजोगाई येथील बालशाहीर आविष्कार येडके यांना प्रदान केला.

हे ही वाचा (Read This) Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

तसेच TMT Productions चे संचालक सचिन अनार्थे यांना शाहिरी मंचाच्यावतीने आत्मसन्मान पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर पत्रकार प्रकाश बनकर , महिला शाहीर इंद्रायणी पाटील, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी, शाहीर विनोद ढगे, शाहीर अनिता खरात, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहीर ईश्वर मगर, शाहीर दिगू तुमवाड, ज्येष्ठ दिग्दर्शक देवदत्त म्हात्रे, डॉ. दीपाली बढे, डॉ. गहिनीनाथ वळेकर, युवराज पाटील, पत्रकार तुषार बोडखे, ज्येष्ठ ढोलकीपटू लक्ष्मण गवळी यांनाही या आत्मसन्मान पुरस्कारने गौरविण्यात आले.

हेही वाचा :- राजकीय सल्लागार प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष स्थापन करणार ?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *