मोठी बातमी : ‘या’ कारणाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी उद्या
राजद्रोहाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी सुनावणी होणार आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली . आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी झाली नाही . मुंबई सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार होती. आज होणारी सुनावणी उद्या होणार आहे. यामुळे दोघांचा कोठडीत मुक्काम वाढला आहे.
हेही वाचा :- PSI भरती घोटाळा ; भाजप महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक
राणा यांच्या जामीन अर्जावर व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं मागील सुनावतीच सांगण्यात आलं होतं की, शक्य झाल्यास आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्त्य दाम्पत्य निवडून आलेलं लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. यामुळे जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे.
हेही वाचा :- अनैतिक संबंधात आड , प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे.
खा. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असं म्हणत राज्य सरकारनं उत्तर दिले आहे.
हेही वाचा : वैज्ञानिक पद्धतिने करा शेळीपालन शेतकर्यांसाठी कमाईचा एक चांगला मार्ग बनू शकतो,जाणून घ्या कसा