क्राईम बिट

अनैतिक संबंधात आड , प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

Share Now

पतीच्या आतेभावाशी सुरु असलेल्या प्रेमप्रकरणात पती अडथळा ठरू लागला. यामुळे पत्नीने शांत डोक्याने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह जाळला होता . मात्र तो अर्धवट जळाल्याने याचा उलगडा झाला.

तब्बल २३ दिवसांनंतर या हत्येचा उलगडा झाला.केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे अर्धवट जळालेला मृतदेह प्रकरणात बुधवारी धक्कादायक खुलासा झाल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा :- धनंजय मुडेंवर बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग?

पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे . विठ्ठल माणिक धायगुडे (३५, रा. औरंगपूर, ता. केज) असे मयताचे नाव आहे. सुमेधा विठ्ठल धायगुडे (३५) व रामदास किसन शितळकर (२२, दोघे रा. औरंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत. सुमेधाला दोन अपत्ये असून, मुलीचा विवाह झालेला आहे, तर मुलगा नववी वर्गात शिकतो.

रामदास हा अविवाहित आहे. या दोन्ही आरोपींना गुरुवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . लाडेवडगाव शिवारात विठ्ठल मांडे यांच्या शेतात विठ्ठल धायगुडे यांचा ८० टक्के जळालेला मृतदेह ज्वारीच्या कडब्यात ३ एप्रिल २०२२ रोजी आढळला होता.

हेही वाचा : वैज्ञानिक पद्धतिने करा शेळीपालन शेतकर्‍यांसाठी कमाईचा एक चांगला मार्ग बनू शकतो,जाणून घ्या कसा 
रामदास शितळकर हा सुमेधा धायगुडे हिचा पती विठ्ठल याचा आतेभाऊ आहे. एकाच गावात राहायला असल्याने व नातेवाईक असल्याने दोन्ही कुटुंबांचे सतत एकमेकांकडे येणे-जाणे असायचे. दोन वर्षांपासून रामदास व सुमेधा या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते . याची माहिती विठ्ठल धायगुडे यास लागल्याने पती-पत्नीत वाद होत होते यामळे सुमेधाने रामदासाला हाताशी घेऊन विठ्ठलाचा खून केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *