१८ दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते तुरुंगातून बाहेर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानासमोर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राडा घातला होता. याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एसटीच्या ११५ कर्मचाऱ्याना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना काल मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. त्यात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होते.
18 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, मी तुरुंगात असताना माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जेजे करता येईल त्यासाठी असेल, असे म्हणत जय श्री राम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात अशा घोषणा सदावर्तेंनी यावेळी दिल्या. हा विजय हिंदुस्थान्यांचा आणि कष्टकरी बांधवांचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.