news

RSS ने माफी मागावी – एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी

Share Now

राजस्थान येथील अलवर राजगडमध्ये तीन मंदिरे पाडल्याची घटना घडली आहे . या मंदिरांमध्ये शिव, हनुमान तसेच इतर देवतांच्या मूर्ती तोडल्याचा आरोप होत होता. परंतु ,मंदिराच्या गाभाऱ्याचे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली . तेथून विधीवत पुजा करुन मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. त्यांची विधिवत प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राजगडमधील ३०० वर्षांपूर्वीचे पुरतान शिव मंदिर पाडण्यात आले आहे. यावरुन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीका केली . राजगडमधील प्राचीन मंदिर पाडणे हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे या घटनेबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :- मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी ; रवी राणा मातोश्रीवर जाण्यास ठाम

३०० वर्षे प्राचीन शिव मंदिर पाडल्याने भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ही धर्मनिरपेक्षता आहे का? असा सवाल मालवीय यांनी राज्यातील सत्ताधारीं काँग्रेसवर केला आहे. विकासाच्या नावाखाली अलवर जिल्ह्यातील पुरातन असणारे ३०० वर्षे जुने मंदिर पाडल्याचे मालवीय म्हणाले. हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

हेही वाचा :- आमदार खासदार असले म्हणून काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शिव मंदिर पडल्याचा निषेध करत, हिंदू संघटनांनी काँग्रेस आमदार काँग्रेस आमदार जोहरीलाल मीना, उपविभागीय अधिकारी केशव कुमार मीना आणि नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी बीएल मीना यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या तिघांवरही मंदिर उद्ध्वस्त करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. विकासाच्या नावाखाली मंदिर उद्ध्वस्त करणे योग्य नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. त्याचवेळी हा रस्ता रुंद करण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर दुसरीकडे ब्रिजभूमी कल्याण परिषदेचे अध्यक्ष पंकज गुप्ता म्हणाले की, गेहलोत सरकार हिंदुविरोधी आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *