देश

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; DA नंतर HRA आणि इतर भत्त्यात भरगोस वाढ होणार ?

Share Now

7 वा वेतन आयोग: DA नंतर, सरकार लवकरच घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवू शकते.सरकारी कर्मचाऱ्यांचा एचआरए (HRA ) लवकरच ३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

7 वा वेतन आयोग: मोदी सरकारने अलीकडेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडूनही एचआरए वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, सरकार HRA वाढवण्याचाही विचार करत आहे. केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांना एचआरए वाढवण्याची घोषणा करू शकते. तसेच फिटमेंट फॅक्टरबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. DA नंतर, सरकार लवकरच घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते देखील वाढवू शकते.

एचआरए (HRA) लवकरच वाढणार

एचआरएमध्ये शेवटची वाढ गेल्या वर्षी जुलैमध्ये झाली होती. तेव्हा DA ने 25% चा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी सरकारने महागाई भत्ता २८ टक्के केला होता. आता सरकारने डीए वाढवला आहे, मग एचआरएमध्येही सुधारणा केली जाऊ शकते. एचआरए वाढल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

HRA इतका वाढेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA लवकरच 3% पर्यंत वाढू शकतो. X श्रेणीतील शहरांमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या HRA मध्ये 3% वाढ दिसू शकते, तर Y श्रेणीतील शहरांमध्ये त्यांच्या भत्त्यांमध्ये 2% वाढ होऊ शकते. याशिवाय झेड श्रेणीतील शहरांमधील कर्मचाऱ्यांचा एचआरए 1% पर्यंत वाढू शकतो. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA 27% वरून 30% पर्यंत वाढेल.

हेही वाचा :- MHT CET 2022 परीक्षा लांबणीवर

अशा प्रकारे HRA ठरवले जाते

सरकारी कर्मचार्‍यांसाठी एचआरए ते काम करतात त्या शहराच्या श्रेणीनुसार निर्धारित केले जाते. X, Y आणि Z या तीन श्रेणी आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २७% दराने HRA मिळत आहे. Y श्रेणीला 18 ते 20 टक्के दराने HRA मिळते. तर, Z श्रेणीला ९ ते १० टक्के दराने HRA मिळते. हा दर क्षेत्र आणि शहरानुसार बदलतो.

हेही वाचा :- उन्हाळ्यात कोकम शरबत पिण्याचे फायदे : कोकम शरबत असे बनवा

फिटमेंट फॅक्टर लवकरच वाढेल

फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकार चर्चा करत आहे आणि लवकरच त्याला मान्यता देऊ शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येणार आहे. सर्व भत्ते 26,000 च्या मूळ वेतनाच्या आधारावर देखील मिळतील. ते सरकारकडे फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी करत आहेत.

हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *