कोल्हापुरात मतदारांना पैसे वाटप ? भाजप कार्यकर्ते चौकशीसाठी ताब्यात
कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक सुरू आहे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या जयश्री पाटील तर भाजपच्या वतीने सत्यजित कदम निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. काल भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात पैशाची पाठविले सापडली या संशयावरून पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली होती मात्र याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असताना आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील राजश्री विद्या मंदिर येथे मतदान केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा दावा करत, जनाधार नसल्याने भाजप पैसे वाटले पण जनता योग्य उत्तर देईल अशी टीका भाजप वर केली.