राज्यात 19 लाख आधार कार्ड बोगस ; चौकशीसाठी समिती स्थापन
महाराष्ट्रात जवळपास १९ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट असल्याची माहिती आज समोर आली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी की सक्रिय समिती स्थापन करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. चौकशीसाठी स्थापन होणारे चकली समितीत निवृत्त न्यायाधीश आणि वकील तसेच सॉफ्टवेअर इंजिनियर असेल.
बनावट आधार कार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून २९ लाख विद्यार्थी विना आधार कार्ड नोंदणी असल्याची माहिती समोर आली.
ब्रिज मोहन मिश्रा यांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाने आधार कार्ड द्वारे नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांतील घोळ समोर आला आहे राज्य सरकारला कारवाई अहवाल न्यायालयासमोर मांडण्याचा देखी आदेश देण्यात आला.