क्राईम बिट

औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ ; ४८ वर्षीय महाराजांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

Share Now

औरंगाबाद :- सहव्यवसायिक क्षेत्रातील महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याचा व्हिडिओ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अश्लील व्हिडिओ दोन दिवसांपासून गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी दोन्ही तालुक्यात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

हि व्यक्ती कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आहेत, तसेच सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला कीर्तनकार या व्हिडीओमध्ये नको त्या स्थितीत असल्याचे दिसतात. विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते आहे. चित्रफितीतील पुरुषाला एक विवाहित मुलगीसुद्धा आहे. हॉटेलवर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना सदरील व्हिडिओ त्यानेच बनवल्याचे दिसत आहे. २ मिनिटे ५४ सेकंदांच्या या चित्रफितीत दोघेही ठळकपणे दिसत आहेत.

हेही वाचा प्रियकराचा लग्नास नकार ; प्रेयसीसह पाच मैत्रिणींनी केलं विष प्राशन

ही चित्रफीत गेल्या दोन दिवसांपासून व समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाल्याने गंगापूर, वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली असून त्यांनी नेमके कोणत्या ठिकाणी व केव्हा चित्रीकरण केले असेल व ते बाहेर कसे आले याविषयी चर्चेला ऊत आला आहे. त्याने स्वतःच चित्रीकरण केल्याने ते समाजमाध्यमातून प्रसारित कसे झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी त्याला अनेकांनी या दुष्कृत्याविषयी जाब विचारल्याची ऑडिओक्लिप देखील व्हायरल झाली आहे. यात त्याने ही चित्रफीत कशी व्हायरल झाली याविषयी शंका उपस्थित केली असून घडलेल्या कृत्याचा खेद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *