आता १८ वर्षावरील सर्वाना मिळणार बुस्टर डोस
सध्या कोरोनाचा प्रभाव जरी कमी झाला असला, तरी नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेता, १८ वर्षावरील सर्वानाच बुस्टर डोस मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवार १० एप्रिल पासून हा डोस सगळ्या गैरशासकीय ( प्रायव्हेट ) लसीकरण केंद्रावर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना पैसे हि मोजावे लागणार आहे. कोविशील्ड साठी ७८० रुपये तर कोवॅक्सीन साठी १४१० रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान बुस्टर डोस घेणे हे अद्याप सक्तीचे नसणार आहे. मात्र ६० वर्षा वरील नागरिकांना हा डॉस शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत मिळत आहे.
दरम्यान, कोरोना नुकताच देशात नाहीसा झाला असून, कोरोनाने होणार मृत्यूदर देखील कमी झाला आहे. तसेच काही दिवसं पूर्वी कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट XE राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात सापडला आहे. तसेच आता XE मुळे देशभरात पुनः कोरोना थैमान घालतो का? असा प्रश्न सर्व सामान्य जाणते समोर उभा आहे.
तसेच, महाराष्ट्राचा विचार केला तर जवळ जवळ सर्वच निर्बंध हटवण्यात आले असून, मास्क वरील सक्ती देखील काढण्यात अली आहे. तसेच मुंबई सारखे मोठे शहर लवकरच संपूर्ण लसीकरण युक्त शहर बननार आहे.