सतीश उके यांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
३१ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना एडीने अटक केली होती. आता सतीश उके यांच्या बद्दल एक मोठी बातमी येत आहे. त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून, न्यायालयाने सतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. सतीश उके यांच्यासह त्यांचे भाऊ प्रदीप उके यांनाही ६ एप्रिल पर्यंत ईडीची कोठडी सुनवली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएल न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सतीश उके यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवार, ३१ मार्चला सकळी पाचच्या सुमारास ईडीने सतीश उकेंच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर पाच तासांच्या तपासानंतर सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडीने उके यांना अटक केली.
सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपुरातील पार्वती नगर येथील घरावर छापेमारी सुरू केली. यावेळी काही कागदपत्रे, मोबाईल, आणि लॅपटॉप ईडीने ताब्यात घेतले आहे.