अंबरनाथमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह, हत्या झाल्याची पोलिसांनी दिली माहिती
ठाणे जिल्यातील अंबरनाथ येथून एक खळबळ जनक घटना समोर अली आहे, रस्त्यावर एका अज्ञात इसमाचा गळाचीरलेला मृतदेह आढळून आला आहे, साधारणतः या इसमाचे वय ३०-३५ असून याची ओळख अद्याप पटलेली नाही, तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रात्रीच्या सुमारास त्याची हि हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. मयत तरुण ३० ते ३५ वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.