महाराष्ट्र

लिफ्ट कोसळून ९ डॉक्टरांचा हॉस्पिटलमध्ये अपघात

Share Now

लिफ्ट कोसळून ९ डॉक्टर जखमी झाल्याची घटना रायगड जिल्यातील पनवेल येथे घडली. नवीन पनवेल येथील अम्ले हॉस्पिटलमध्ये हि घटना घडली. लिफ्टमध्ये खराबी आल्याने काही क्षणात तळमजल्यावर आदळली .  यामुळे लिफ्टमध्ये असलेल्या ९ डॉक्टर जखमी झाले असून . सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेड जवानांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर तळ मजल्यावर जेवणासाठी निघाले. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *