VIDEO | कात्रज येथे सिलेंडर स्पॉट, कारण अध्याप अस्पष्ट

पुणे : पुण्यातील कात्रज येथे सिलेंडरचा स्पेट झाला. या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला आहे. धडकी भरवणारे स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याने नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय.

कात्रजमधील गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट होत असून अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. या स्फोटांनी या परिसरात खळबळ माजली आहे. या स्फोटात किती हानी झाली आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *