दहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू , आत्महत्या कि घातपात?

बीडः शहरात दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थीनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. नातेवाईकांच्या व कुटुंबियांच्या सांगण्यानुसार सृष्टीने आत्महत्या करण्यासारखे काही कारणच नव्हते. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे की घातपात, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सृ तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते. मात्र तिचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सृष्टी रोहिदास काळे ती सोळा वर्षांची होत. ती बीडमधील छत्रपती कॉलनीत वास्तव्यास होती. मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आढळला. नातेवाईकांन पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सृष्टीचा मृतदेह काढण्यात आला आणि पुढे शवविच्छेदनासाठी देण्यात आला. शिवाजी नगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सृष्टीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल जप्त केला असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *