‘द काश्मीर फाईल’ वर शरद पवारांचे वक्तव्य, म्हणले…

देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. अशीच प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

“या चित्रपटामधून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिले गेले. शिवाय समाजा-समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. तसेच जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि तो चित्रपट अतिशय चांगला आहे, असे देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एक वाक्यता टिकवायची कशी?” असे पवार म्हणले.

भाजप या चित्रपटाला समर्थन देत आहे. स्वतः मोदींनी देखील हा चित्रपट पाहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या चित्रपटावर सिनेसृष्टी देखील मन भरून कौतुक करत आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *