जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पाच टक्के मागत आहे खा. इम्तियाज जलील यांचा आरोप

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ५०:५४ अंतर्गत जनसुविधांच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे हे पाच टक्के मागत आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर करुन केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याचे वार्षिक नियोजन केले आहे. जिल्हा नियोजनअंतर्गत जिल्हा परिषदेसाठी १५६ कोटींचे नियोजन करण्यात आले. या अंतर्गत ५०:५४ च्या कामांसाठी ५४ कोटींचा निधी सभापती किशोर बलांडे यांनी मंजूर करून घेतला आहे.

मंजूर केलेल्या निधीतुन खासदार इम्तियाज जलील यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात कामासाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव किशोर बलांडे यांच्याकडे दिला आहे . मात्र सभापती बलांडे यांनी खासदार यांना केवळ पन्नास लाखांच्या कामांचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. यावर खासदार इम्तियाज जलील व सभापती यांच्या चांगली शाब्दिक खडाजंगी झाली. यावर ५० लाखांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजुरी केलेला असल्याचे सभापती बलांडे यांनी इम्तियाज जलील यांना सांगितले. सभापती यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्यांना दोन कोटी असा निधी वाटप करण्यात येत आहे, आणि खासदारला ५० लाखांचा निधी मंजूर केल्यामुळे खासदार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून नाराजी दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *