क्राईम बिट

औरंगाबादेतील दुर्दैवी घटना ; तीन मुलांचा शेतळ्यात बुडून मृत्यू

Share Now

औरंगाबाद जवळील शरणापूर शिवारात शेततळ्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली. यात प्रतीक आनंद दिघे असे (वय १४) तिरुपती मारुती कुडाळकर (वय १४) आणि शिवराज संजय पवार (वय १६) अशी मृत मुलांची नावे आहेत. तीनही मित्र रविवारी दुपारी सायकल घेऊन फिरायला गेले होते. मात्र सायंकाळी देखील घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरवात केली.

मात्र तिघेही घरी न परातल्याने कुटुंबियांनी रविवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली मात्र तिघेही सापडले नव्हते.
या आज सकाळी शरणापूर शिवारातील नारायण वाघमारे यांच्या शेताजवळ सायकल आढळून आल्या होत्या जवळच असलेल्या शेततळ्यात तिघांचे मृतदेह देखील आढळून आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *