अशोक चव्हाणांना पुन्हा कोरोनाची लागण, कॅबिनेटच्या बैठकीतून पडले बाहेर
मुंबई : सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. तरी देखील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. कॅबिनेट मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ते उपस्तित होते. त्यावेळी त्यांना त्याचा रिपोट मिळाला. आपण पॉसिटीव्ह असल्याचे समजताच त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर राजकीय क्षेत्रात त्यांच्या आरोग्याची अनेकांना काळजी वाटत आहे.
राज्यात अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यातल्या काही मंत्री आणि नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे.