मनोरंजनराजकारण

खा. अमोल कोल्हेच्या भूमिकेवर शरद पवार यांची पाठराखण

Share Now

Why I Killed Gandhi या चित्रपटामुळे खा. अमोल कोल्हे यांचं राजकीय भवितव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कालच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला, या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली असून . यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे.

शरद पवार यांनी आज म्हटलं की, गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

आज यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले.

अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली, मला माहिती आहे, अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. किंवा नथुराम गोडसेने जे काय काम केलं, त्याबद्दल सारा देश जाणून आहे, असं पवार म्हणाले.

अमोल कोल्हेवर भाजपकडून देखील टीका झाली यावर शरद पवार म्हणाले की, भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले ? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *