राज्यातील शाळा २४ जानेवारीला होणार पुन्हा सुरु
मुंबई : वाढत्या कोरोनामुळे शालेय विध्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून शाळा व महाविद्यालय १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा आकडा कमी होत असल्याने राज्यात पालक आणि विध्यार्थी यांनी शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर शाळा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी या प्रस्तावाला हिरवे कंदील दाखवले.
दरम्यान, शाळेत कोरोना नियमावलीचे पालन सक्तीने व्हावे याची काळजी शाळेची असले. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचे पालन होणे आवश्यक असणार आहे, महाविद्यालयांवर आणखीन कुठल्याच प्रकारचा निर्णय आलेला नाही. तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी देखील शिक्षण पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहे.