एसटी कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही – शरद पवार यांची मध्यस्थी आली कामाला.
मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नव्हता, आज खा शरद पवार यांनी मध्यस्ती करून एसटी कामगारांच्या कृती समिती सोबत बैठक घेऊन तोडगा काढला आहे.
या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं. इतकंच काय तर यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यावर अखेर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहे,
त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य परिवहन मंडळाची कृती समितीच्या २२ कर्मचारी संघटना त्यांच्यासोबत बैठक झाली समिती आहे. २८ ऑक्टोबरच्या बैठकीत मागण्या मान्य केल्या होत्या त्यात काही त्रुटी असल्याचे दिसून आले.असे अनिल परब यांनी सांगितले तसेच
कोरोनाच्या काळात एसटी बंद होती त्यात मोठं नुकसान महामंडळाला सहन करावा लागेल तरी देखील सरकराने पगार वाढ दिली. हि पगार वाढ मूळ वेतनात आहे. तरी देखील संप सुरूच होता. याबाबतीत आमची अशी भूमिका होती चर्चेतून प्रश्वर सोडवता येईल.
राज्य शासनाने ७ व्या वेतनवाढी प्रमाणे पगार वाढ द्यावी अशी मागणी कृती समितीने दिली आहे, यावर पूर्ण अभ्यास करून चर्चा करण्यात येईल.परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी आधी कामावर याव .
एसटी कर्मचाऱ्यांवर तीन वेळा कारवाई झाली त्यात आम्ही मुदत दिली, मी देखील दररोज आव्हान करत आहेत. जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, एसटी पूर्ण पने सुरु झाल्यावर आम्ही निर्णय घेण्यात येईल अशी अट परिवहन मंत्री अनिल परब यांनी घातली आहे.
कृती समितीने पगार वाढीवर असलेली तफावत असेल सातवे वेतन आयोग किंवा कर्मचारी कारवाई असेल यावर आम्ही सकारात्मक चर्चा केली. आज खासदार शरद पवार यांनी देखील आज २२ कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या सदस्यासोबत बैठक घेऊन त्यांना कामावर हजर राहण्याचा आवाहन केलं आहे.
संप मागे घ्यायला हवा एसटी कामगारांनी कामावर यायला हवं, त्यामुळे प्रवासी आणि एसटीच नुकसान होणार नाही. असे बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.