आता पोलिसांना देखील “वर्क फ्रॉम होम” – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांना देखील कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा सामना करावा लागत असतो. नागरिकांना दिलेले निर्बंध पाळण्याचा आवाहन करत असताना पोलीस प्रशासन मात्र दिवसरात्र मेहनत करत असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामुळे राज्य गृह विभागाने खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांना देखील वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय दिला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना कि, ५५ वर्षवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आला आहे. ५५ वर्षवरील पोलिसांनी कर्तव्यावर न येता घरूनच काम करावं . तसेच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार आहे.
राज्यातील ९५१० पोलिसांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यातील १२३ पोलिसांचं मृत्य झाला.