महाराष्ट्र

पुरवठा अधिकारी आणि शेतकरी संघटनेचा पदाधिकारी अडकले लाचेच्या जाळ्यात

Share Now

मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज देत पैशाची मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह एका पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारा पुरवठा अधिकारी एस. टी. कुंभार या दोघांना आज लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. माजलगाव येथे ही घटना घडली.

माहिती अधिकाराचा दुरूपयोग करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्रास देणे, त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे असे प्रकार बरेचदा समोर येत असतात. एखादा अधिकारी ऐकत नाही म्हटले की त्याच्यावर आरोप करून, त्याच्या विरोधात तक्रारी, अर्ज असे प्रकारही सुरू होतात. शेतकरी संघटनेचे काम करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करा, अशी मागणी करत तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला.

अर्जाची चौकशी करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यामार्फतच संबंधिताकडे तडजोड आणि त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. पण संबंधितांने आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यामुळे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आणि पुरवठा अधिकारी दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले.
माजलगाव येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने केली होती. याची चौकशी पुरवठा अधिकारी एस. टी. कुंभार यांच्याकडे होती. या प्रकरणात नरवडे याने पैशाची मागणी केली व त्यात कुभार यांनी मध्यस्थी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *