महाराष्ट्र

MPSC आयोगा विरोधात बोलाल तर परीक्षेला मुकाल

Share Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(maharashtra public service commission) परिपत्रक काढले, MPSC च्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवाराने(MPSC candidate) असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय भाषेत टीका टिपणी किंवा संभाषण केल्यास कारवाई करण्यात येईल. MPSC आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येईल असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा (maharashtra public service)आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत नाराज असलेले उमेदवार आयोगाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका टिपणी करत असतात, तसेच शासकीय सेवेत (gov service) येऊ इच्छिणाऱ्या लोकसेवकांकडून सार्वजनिक लोक सभयतेचे भान ठेऊन संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित असते, परंतु प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यावर मत व्यक्त करताना असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय भाषेत टीका टिपणी केलीं जात असल्याचे MPSC आयोगाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाच्या या भूमीकेवर राज्यातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे, राज्यात दरवर्षी जवळपास २० लोकं विद्यार्थी MPSC ची परीक्षा देत असतात, गेल्या दोन वर्षत अनियमित होणारी परीक्षा यावर विद्यार्थी संताप व्यक्त करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *