महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत अपशब्द वापरले आहेत. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण यांच्याविरोधात रायपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत. शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण यांचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे.

कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मूळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’ आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही ते कालीमातेची आराधना करायचे. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने २०१७ मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *