राजकारण

ममताची पेनल्टी किक काँग्रेससाठी नवा गोल!

Share Now

दोन दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दौरा झाला आणि राज्याच्याच नाही तर देशातील राजकारणात नरेंद्र मोदींच्या विरोधात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडी बाबत चर्चेला उधाण आली.परंतु यात काँग्रेसला बाजूला सारून नवं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न तर नाही ना ?

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस मुक्त भारत चा नारा दिला होता, जवळपास १५ वर्ष काँग्रेस सलग सत्तेवर होती आणि त्यात भाजप कडे पंतप्रधान पदासाठी असलेला उमेदवार आणि निवडणूकिमध्ये केलेलं नियोजन यशस्वी ठरले.
२०१९ च्या निवडणूक यातही भाजप च्या नियोजन आणि पंतप्रधान पदाचा नरेंद मोदी यांच्या विराधात सक्षम चेहरा नसल्याने विरोधकाच्या पदरी निराशाच आली आहे.
गेल्या दोन वर्षात मात्र परिस्थिती काही बदलली आहे,
वाढती महागाई , तीन कृषी कायदे , असे बरचे निर्णय मोदी सरकारला महागात पडले.

गेल्या एका वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आलेलं अपयश यामुळे विरोधकाच्या आशा पुन्हा प्रज्वलित झाल्या आहेत.

काल झालेल्या दौऱ्याने काँग्रेसला बाजूला ठेऊन तिसरी आघाडी करतील का ? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात खा. शरद पवार , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली .

फक्त महाराष्ट्र नाही तर हरियाणातील अशोक तवर, यूपीचे ललितेस त्रिपाठी , बिहारचे कीर्ती आझाद याना देखील आपल्या गळाला लावले आहे. प्रणव मुखर्जीचा मुलगा अभिजित मुखर्जी आणि आसाम महिला काँग्रेस अध्यक्ष सुश्मिता देव, मेघालायच्या मुकुल संगम यांच्यासह अकरा आमदार ममता बॅनर्जीच्या टीएमसी मध्ये गेले आहेत. यामुळे त्यांना तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची चटक लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *