बनावट कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट अनेक ठिकाणचे एंट्री तिकीट
लोकांच्या नोकऱ्या – व्यवसाय उद्योग आता कुठे सुरु झालेत. गेल्या दीड वर्षात कोव्हीड ने सगळे
सुरू झाल्या आहेत.बऱ्याच कॉलेज, शाळा,संस्था, सरकारी आणि खासगी नोकरीच्या ठिकाणी कोविड लसीकरण अनिवार्य झाले आहे. यामुळे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवण्याच्या घटना घडत आहेत.सायबर सिक्युरिटी फर्म चेक पॉईंट यांच्या रिसर्च नुसार फेसबुक आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ‘अँटी व्हॅक्सिनेशन ग्रुप्स’ लोकांना काही टेलिग्राम ग्रुप्स पाठवतात ज्यात बनावट लसीकरण सर्टिफिकेट ऑफर केले जाते. सायबर सिक्युरिटी फॉर्म चे पॉईंट रीसर्चच्या मार्च 2021 मधील रिपोर्टनुसार डार्क नेटमध्ये बनावट लसीकरण पासपोर्ट जगभरात विकले जायचे.सायबर सिक्युरिटी रिसर्च करणाऱ्यांना कळाले की जानेवारी 2021 पासून डार्क नेटवर कोविड लसीकरणाच्या जाहिराती 300 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
गुजरातमधील राजकोटमधे खांबलिया शहरात स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) बनावट लसीकरण सर्टिफिकेट स्कॅम मध्ये 3 लोकांना अटक केली आहे. यातील विपूल चव्हाण हा सरकारी हेल्थ सेंटर मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर होता.ऑगस्ट 2021 चे हे प्रकरण आहे. पोलिसांना याची माहिती मिळाली आणि टाकल्यावर सात बनावट व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट जप्त करण्यात आले. तपासात समोर आले की हे तीन लोक कस्टमरला शोधून त्यांना बनावट व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट साठी विचारायचे.या केस मध्ये आरोपी वैद्यकीय विभागातील कामगारांचे लॉग इन आयडी आणि पासवर्डचा तर करून बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवायचे. एक बनावट सर्टिफिकेट ते 1000 -2500 पर्यंत विकायचे.
औरंगाबादमधील महानगरपालिका लसीकरण केंद्रावरही लसीचे बनावट सर्टिफिकेट तयार केल्याचे उघडकीस आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने कॉविन ॲपचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून बेकायदेशीरपणे लोकांची नोंदणी केली आहे.पोलिसांनी स्टेटमेंट दिला आहे की 16 लोक लसीकरण न घेता बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. हे 16 लोक एकाच कुटुंबातील आहेत.कॉवीन अँप वर घेणाऱ्यांची संख्या अचानक 55 पासून 71 झाली. लसीकरण केंद्राच्या क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरामध्ये लसीकरण सर्टिफिकेट ज्यांना भेटले हे 16 लोक दिसले नाही.लसीकरण घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याने वैद्यकीय स्टाफ मधल्या एकाने अलर्ट जारी केला होता त्यानंतर सिविक बोडी ची टीम लसीकरण केंद्रावर पोहोचली
तेलंगणामधील हैदराबादमध्ये बनावट लसीकरण सर्टिफिकेट जारी केल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्येकी सर्टिफिकेटची किंमत 2000 ते 5000 आहे. या रॅकेटमध्ये लसीकरण केंद्रामधल्या स्टाफ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे रॅकेट कोविडमुळे मृत्युमुखी पावलेल्या लोकांचे देखील लसीकरण सर्टिफिकेट देत आहेत.सरकारने याबाबत चौकशीचा आदेश दिला आहे.कोवीन अँप मधून फेक सर्टिफिकेट बनवायला फक्त आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबरच्या आधारे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले जायचे.
अनेकजण कोविड लसीकरणाच्या विरोधात आहेत. एका आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसच्या तपास अनुसार बऱ्याच लोकांनी बनावट कोविड लसीकरण सर्टिफिकेटचा पर्याय का शोधत आहे याचे कारण शेअर केले.लोकांनी म्हटले की व्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये खूप दिवसांचे अंतर आहे आणि त्यांना लवकरात लवकर सर्टिफिकेट हवे आहे. काही ठिकाणी ते मागितले जाते, काही महत्त्वाच्या जागी या सर्टिफिकेटशिवाय प्रवेश नाही. अनेक उद्योगांमध्ये कामगारांना सर्टिफिकेट अनिवार्य केले गेले. प्रवासातही सर्टिफिकेट महत्त्वाचे ठरत आहे, कारण ते नसेल तर कोव्हीड तपासणी होते आणि टी लोकांना नको असते. काही जणांचा गैरसमज आहे की लसीकरणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे लस टाळून ते फक्त सर्टिफिकेट घेऊन आपल्या लसीकरणाचे प्रमाण देतात. यामुळेच देशात बनावट कोविड लसीकरण सर्टिफिकेट बनवण्याचे गुन्हे घडत आहेत.