मुकेश अंबानी पिझ्झा बर्गर विकणार !
होय…
हे खरं आहे, मुकेश अंबानी यांनी आता नव्या क्षेत्रात पाऊल टाकायला सुरुवात केली असून “सबवे इंडिया” त्यांच्यासाठी नवा हायवे ठरणार आहे. हे सबवे आहे अमेरिकेतील सर्वात मोठे रेस्टोरंट चेन आहे भारतीय फ्रँचाइजी चेन मुकेश घेत आहेत आणि १४०० ते १८०० कोटी दरम्यान हा सौदा असेल. यामाध्यमातून भारतातील एकूण ६०० स्टोअर्स अंबानी यांच्या हाती येतील.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल कंपनी सबवे (इंडिया) फ्रॅंचाईजला विकत घेण्याच्या तयारीत आहे. सबवे इंडिया भारतात फारसे चालले नाही कारण डॉमिनोज, पिझ्झा हट, केएफसी, हे मोठे फास्ट फूड ब्रँड स्पर्धेत आहेत. सबवे इंडिया ही भारतात तोट्यात असणारी कंपनी. मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता सबवे इंडियाला 200 ते 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 1690 कोटी रुपयात विकत घेण्याच्या तयारीत आहे.. रिलायन्सचे देशभरात जवळपास 1400 पेट्रोल पंप आहेत पण सध्या लॉक डाऊन आणि इतर कारणांमुळे त्या धंद्यात त्यांचा फारसा फायदा होत नाहीये.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आता हायवे बिझनेस कॉन्सेप्टमधे इन्वेस्ट करायचे आहे हायवे रिटेल बिझनेस कॉन्सेप्ट अमेरिकेत फार लोकप्रिय आहे. मुकेश अंबानी हायवे रिटेल बिजनेस मध्ये इन्वेस्ट करत असेल तर मार्केट मात्र हादरणार हे नक्की. 2016 मध्ये मुकेश अंबानींनी ‘जिओ क्रांती’ कशी आणली होती हे सगळ्यांना लक्षात आलेच. भारतात फूड अँड बेव्हरेज व्यवसायातमध्ये परत अशा क्रांतीची शक्यता नाकारता येत नाही
रिलायन्स रिटेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे जॉईंट व्हेंचर रिलायन्स बीपी मोबिलिटी,हायवेवर असलेल्या पेट्रोल पंपावर रिटेल व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. जलद सेवा देणारे रेस्टॉरंट्स, कॅफे, डिजिटल ग्रोसरी स्टोअर्स ,ईव्ही चार्जिंग पॉइंट, इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग, फुड अंड बेवरेज हे सर्व व्यवसाय रिलायन्स सुरू करणार आहे. रिलायन्स रिटेल कंपनीची अन्य फूड अँड बेव्हरेज कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. येत्या काही वर्षात रिलायन्स ५५०० पेट्रोल पंप उघडण्याची शक्यता आहे. रिलायन्सला हायवे रिटेलिंग व्यवसायामध्ये मध्ये गुंतवणूक करायची आहे यामुळेच त्यांची सबवे इंडियाला विकत घेण्याचा निर्णय घेतलाय.
इकॉनोमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार जर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) सबवे इंडिया ला विकत घेतलं तर देशभरातील ६०० सबवे इंडियाचे स्टोअर्स RIL च्या मालकीचे होतील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची स्पर्धा मार्केट मधल्या मोठ्या फास्ट फूड कंपन्या डोमिनोज, पिझ्झा हट,बर्गर किंग स्टार बक्स यांच्यासोबत असेल. २०१६ मध्ये जेव्हा Jio आले होते तेव्हा मार्केटमध्ये आधीच टॉपला असलेल्या टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. एअरटेल, वोडाफोन,आयडिया या या मोठ्या टेलिकॉम कंपनीना मागे टाकून Jio टॉपला जाऊन पोहोचला होता. जर रिलायन्सने सबवे इंडियाला विकत घेतले तर रिलायन्सची स्पर्धा डॉमिनोज पिझ्झा हट, बर्गर किंग, केएफसी —यांच्यासारख्या मोठ्या फास्ट फूड चेनसोबत असेल. आता ही स्पर्धा किती रंजक असेल हे लवकरच कळेल. पण यानिमित्ताने फूड अँड बेव्हरेज मध्ये तहलका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.