Government jobs:तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122जागा ,जाणून घ्या लागणारे कागदपत्रं !
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी काय कागदपत्रं आवश्यक असणार आहेत हे जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यकया आहे. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असावं. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे..
भाजी देशी आहे की संकरित आहे हे कसे कळेल? हायब्रीड हे आरोग्यासाठी चांगले का मानले जात नाही
ही कागदपत्रं असणं आवश्यक
10वी / SSC गुणांची यादी,स्कॅन केलेला फोटो,शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.),मेल आयडी आणि फोन नंबर,जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल),नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास),अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास,जन्मतारीख प्रमाणपत्र,स्कॅन केलेली स्वाक्षरी