औरंगाबादकरानां दिलासा पाणीपट्टीमध्ये 50% दरकपात !-पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

• पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजारांवर
•पाण्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती
•शहराला होणार 15 द.ल.लि अतिरिक्त पाणी पुरवठा

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न सध्या गंभीर झाला असून संपूर्ण शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होतोय. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने पाणीप्रश्नावर आंदोलन केले होते तसेच येत्या काही दिवसांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहरात आंदोलन होणार आहे.

या आधीच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मोठी घोषणा केली आहे. शहरातील नागरिकांना पाणीपट्टी चार हजार रुपयावरून आता दोन हजार रुपये केली करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तसेच शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 15 द. ल. लि अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

 

यात पालकमंत्री म्हणाले की, शहराला मुबलक, समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

सद्यपरिस्थिती पाहता नागरिकांकडून पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून समाधानकारक पाणी मिळेपर्यंत दोन हजार रुपये करण्याच्या सूचनाही महापालिकेला पालकमंत्री
यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंह, महापालिकेचे सर्व उपायुक्त, शाखा प्रमुख आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *