कचाकचा बटण दाबा…नाहीतर निधी द्यायला माझा हात आखडता येईल!

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात, नुकताच पवारांनी इंदापूरमध्ये असेच वक्तव्य केले.”आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल”
अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका.विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.

IIMमध्ये शिकण्याचे तुमचे स्वप्न CAT न देताही पूर्ण होईल,याअभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळेल
जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात. मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते, असे देखील अजित पवार म्हणाले.

RPF मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती,10वी पास अर्ज करू शकतात
अजित पवार म्हणाले, जो उमेदवार दिला आहे तिथल्या आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो त्याला इच्छा असते खासदारांने ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो ते ढवळाढवळ करणार नाहीत ते बाहेरचे वाटणार नाही ते तुम्हाला आपले वाटतील.मतदान करताना नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवावा लागेल,पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25- 50 वर्षाचा विचार करुन काम करा. माझ्या बारामतीत सुद्धा 382 कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल कामाचा आढावा घेईल. आम्ही जो उमेदवार दिला आहे तो देखील काम करेल, असेही अजित पवार म्हणाले.

Explained -भूमिका बदलणाऱ्या विजय शिवतारेंचा अजित पवारांना किती फायदा होईल?

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *